top of page

स्वप्नांची नगरी: Mumbai

Mumbai: Through the lens of a Mumbaikar. Sharing a beautiful experience through her penned down verses is a short poem;

Graphic by Sharvil More, 4A

स्वप्नांची नगरी


गेटवे ऑफ इंडिया-commemorates the advent of britishers...

तेव्हापासून मुंबई सगळ्यांच स्वागतच करतेय;

स्वतःवरचा भार वाढला तरीही

ना कोणामध्ये भेदभाव, ना नात्यांचं लेबल; सगळ्यांना आपलंसं करतेय !

मुंबई चौपाटीवरच्या भेळीसारखी आहे;

सगळ्यांना एकत्र आणून जीभेला चटकदार चव देते

खरंतर ही आमची मुंबई नाही; ही आपली मुंबई आहे !


पाणी खूप साठतं इकडे; कधी पूरात, तर कधी डोळयात;

एसीमधे झोपूदे किंवा फूटपाथवर,

प्रत्येकजण गर्वाने स्वतःला मुंबईकर समजतात !

फिनिक्स मॉल असू दे, हिल रोड किंवा चोर बाजार;

जिवाची मुंबई इकडे सगळेच करतात;

म्हणून तर हिला आपली मुंबई म्हणतात!


इकडे सगळीकडे गर्दीच गर्दी; बाहेर लोकांची, आत विचारांची....

पण एवढ्या गर्दीतही शेवटी माणूस एकटा पडतो....

स्टेटसच्या शर्यतीमध्ये जितकं वर राहायचं तितका खिसा खाली होतो;

इथे फुटपाथपण हाऊसफूल असतो,

अंतर असतं, ते स्वप्नात आणि प्रत्यक्षात....

अपेक्षा कमी होतात आणि आयुष्य फास्ट फॉरवर्ड होतं!

सगळे स्वतःच्याच धुंदित असतात.....

कारण सगळं लक्ष गाडीच्या पायदान आणि फलाटामधल्या अंतरावर असतं .....

तरी मुंबई एकत्र चालते; टिकून राहते;

कारण काहीही झालं तरी ही आपली मुंबई आहे....


जेव्हा धकाधकीच्या आणि धक्काबुक्कीच्या जीवनातून ब्रेक घ्यावासा वाटतो.

तेव्हा पावलं आपोआप समुद्राकडे वळतात....

रात्रीचं मरीन ड्राईव्हस, जुनी गाणी आणि लाटांचा आवाज;

क्षणभर थांबावसं वाटतं; पण मुंबई थांबू देत नाही,

इथे जो थांबला तो संपला.

इथे माणूस पडतो, धडपडतो, फसतो, ठोकरा खातो, पुन्हा उठतो;

पण या मुंबईला सोडून जात नाही...

कारण मुंबई त्या कृष्णविवरासारखी आहे

ज्यात एकदा काही गेलं कि परत येत नाही!

कारण जो येतो तो आपला होतो... आपल्या मुंबईचा !


मुंबईची माणुसकी जागी होते ती सणावारांमध्ये,

२६ जुलैच्या पावसामध्ये किंवा २६/११ च्या हल्ल्यामध्ये....

मुंबई धीर देते, विश्वास देते, प्रेरणा देते, स्वप्न दाखवते;

असे म्हणतात मुंबई कधीच झोपत नाही!

तरी मुंबईला स्वप्नांची नगरी म्हणतात.....

कारण कलामांनी खरं म्हटलंय,

झोपेत पाहिलेलं स्वप्न नसतं;

जे झोपू देत नाही ते स्वप्न असतं...

-रसिका साळगांवकर Image Credit - Sharvil More @_citycollage_


Yorumlar


bottom of page